२३ नगरसेवकांना अपात्रतेचा दणका !

Foto

भाजपच्या ७, तर एमआयएमच्या १६ नगरसेवकांना नोटिसा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): तिसरे अपत्य, बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे यांसारख्या गंभीर कारणांवरून छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने तब्बल २३ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या ७, तर विरोधी पक्षनेत्यासह एमआयएमच्या १६ नगरसेवकांचा समावेश आहे. मनपाच्या या धडक कारवाईमुळे महापालिकेच्या वर्तुळात आणि राजकीय क्षेत्रात खळबळ
उडाली आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम १० (ड) (१) नुसार दोन पेक्षा जास्त अपत्ये असणे, अनधिकृत बांधकाम करणे, तसेच सरकारी जागेवर अतिक्रमण करणे, आदी प्रकरणात तथ्य आढळून आल्यास संबंधित नगरसेवकाचे पद रद्द करण्याची तरतूद आहे. त्यानुसार विरोधी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागातून विजयी झालेल्या अनेक नगरसेवकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आलेल्या
संभाजीनगर
आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने नगर सचिव विभाग, जन्म-मृत्यू विभाग, अतिक्रमण विभागाकडून चौकशी करून अहवाल मागविण्यात आला होता. हा अहवाल प्राप्त होताच प्रशासनाने शुक्रवार,
म्हणणे मांडण्याची संधी
▶ नगरसेवकांना दिलेल्या नोटिसीनुसार त्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक नगरसेवकाला वेगवेगळी तारीख सुनावणीसाठी देण्यात आलेली आहे. आपले म्हणणे कागदपत्रांसह सादर करावे, म्हणणे सादर केले नाही तर एकतर्फी निर्णय घेतला जाईल, असेही बजावलेल्या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.
३१ रोजी ३७ नोटिसा बजावल्या आहेत. त्यात २३ नगरसेवकांचा समावेश असून, भाजपचे सात, तर एमआयए पक्षाच्या १६ जणांचा समावेश असल्याचे सूत्रांनी
सांगितले. अनेकांना तिसरे अपत्य, बेकायदा बांधकामे अशा दोन प्रकारच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.